अतिवृष्टी नुकसान भरपाई: हेक्टरी ₹18,500 की ₹8,500 ? पहा सविस्तर
Ads
×
कॉल करा
₹ किंमत पहा
खरेदी करा
अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे नुकसान झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांमध्ये सध्या नुकसान भरपाईच्या रकमेवरून मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. माध्यमांमध्ये शेतकऱ्यांना हेक्टरी ₹18,500 मदतीची घोषणा केली जात असताना, शासनाचे अधिकृत जीआर (Government Resolutions) मात्र ₹8,500 प्रति हेक्टर मदतीचा उल्लेख करत आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात अनेक प्रश्न उभे राहिले आहेत….
शेतकऱ्यांना दिली जाणारी ₹8,500 प्रति हेक्टर ही मदत एनडीआरएफ (राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी) च्या निकषानुसार निश्चित करण्यात आलेली आहे. या निकषानुसार, जिरायती/खरीप पिकांसाठी ही मदत दोन हेक्टरच्या मर्यादेत दिली जाते. सध्या अनेक जिल्ह्यांसाठी जे निधी वितरणाचे जीआर आलेले आहेत, ते या NDRF निकषावर आधारित आहेत, ज्यामुळे त्यामध्ये केवळ ₹8,500 चा उल्लेख दिसत आहे आणि त्याप्रमाणे पैसे जमा होत आहे…
Ads
×
कॉल करा
₹ किंमत पहा
खरेदी करा
Ndrf च्या मदतीव्यतीरीक्त राज्य शासनाने रब्बीसाठी 10 हजार रूपयांची वाढीव मदत जाहीर केली आहे. Ndrf चे 8500 आणि वाढीव मदत 10000 ₹ मिळून एकूण 18500 होतात..मात्र NDRF ची मदत आणि वाढीव मदत दोन वेगवेगळ्या टप्प्यात दिली जानार आहे.
Ads
×
कॉल करा
₹ किंमत पहा
खरेदी करा
राज्य सरकारने अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तीन हेक्टरच्या मर्यादेत नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली आहे. याचा अर्थ, NDRF च्या दोन हेक्टर मर्यादेव्यतिरिक्त, एका हेक्टरचा वाढीव निधी राज्याच्या विशेष निधीतून दिला जाणार आहे, ज्यामुळे एकूण नुकसान भरपाईची रक्कम वाढते. या वाढीव निधीसाठीचा जीआर लवकरच येणे अपेक्षित आहे.
म्हणून, शेतकऱ्यांनी केवळ बातम्यांवर विश्वास न ठेवता, मदतीच्या अधिकृत जीआरचे नीट वाचन करावे आणि संभ्रम दूर करावा. अंतिम मदत ₹8,500 प्रति हेक्टर दराने तीन हेक्टरच्या मर्यादेत दिली जाणार आहे. याशिवाय, पूर्णतः बाधित तालुक्यांतील शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी ₹10,000 निविष्टा अनुदान (Input Subsidy) देखील देण्याची योजना आहे.
ज्यासाठी शेतकऱ्यांनी आपला आधार कार्ड, बँक पासबुक आणि फार्मर आयडीची माहिती प्रशासनाकडे त्वरित जमा करणे आवश्यक आहे. ही सर्व मदत निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी वाटप करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.