एवढे दिवस आवकाळी पाऊस, या जिल्ह्यात होनार मुसळधार.. तोडकर हवामान अंदाज
Ads
×
कॉल करा
₹ किंमत पहा
खरेदी करा
हवामान तज्ज्ञ तोडकर यांच्या अंदाजानुसार १५ ऑक्टोबर रोजी सकाळपासूनच वारे जोराने वाहणार असून त्यांची दिशा पूर्व-पश्चिम असेल. संपूर्ण मराठवाडा आणि विदर्भात ढगाळ वातावरण राहील. मात्र, वारे वाहत असल्याने दुपारी चार वाजेपर्यंत पाऊस सक्रिय राहणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी सकाळपासून ते दुपारी ४ ते ५ वाजेपर्यंत त्यांची शेतातील खळे बिनधास्तपणे आटोपून घ्यावीत कामांमध्ये कोणताही अडथळा येणार नाही, असे सांगण्यात आले आहे.
दुपारनंतर, संध्याकाळच्या वेळेस पावसाची सक्रियता वाढेल. नांदेड, लातूर, बीड, धाराशीव (उस्मानाबाद), परभणी, यवतमाळ आणि चंद्रपूर या भागांमध्ये ३० ते ४०% व्याप्तीचा पाऊस होऊ शकतो. बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) आणि जालना जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी किंवा “पेंडवणी” स्वरूपाचा हलका पाऊस असेल असे तोडकर यांनी सांगितले.
Ads
×
कॉल करा
₹ किंमत पहा
खरेदी करा
१६ ऑक्टोबर रोजी देखील पावसाची स्थिती
१५ तारखेप्रमाणेच राहील, परंतु अनेक भागांमध्ये व्याप्ती कमी होण्याची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीला ६०% पाऊस अपेक्षित आहे, तर नाशिक आणि पुणे जिल्ह्यांमध्ये २० ते २५% व्याप्तीचा पाऊस असू शकतो. छत्रपती संभाजीनगरमध्ये व्याप्ती २५% च्या आतच राहील आणि केवळ मध्यम बुरबुर होण्याची शक्यता आहे. नागपूर, चंद्रपूर, गोंदिया या विदर्भातील भागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होईल. परभणीमध्ये १६ तारखेला १५ तारखेपेक्षा कमी पाऊस असेल. खान्देश (धुळे, जळगाव) भागात सर्वदूर पाऊस नाही, तर २०% च्या आतमध्ये तुरळक सरींची शक्यता आहे. या कालावधीत दक्षिण सोलापूर आणि नांदेड पट्ट्यात पावसाची सक्रियता जास्त राहील.
Ads
×
कॉल करा
₹ किंमत पहा
खरेदी करा
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, १७ आणि १८ ऑक्टोबर पासून वातावरणात सुधारणा होऊन ते नॉर्मल होईल. त्यानंतर पाऊस केवळ १ ते २% इतका किरकोळ बुरबुर स्वरूपात असेल. त्यामुळे मुख्य पावसाचा जोर फक्त १५ आणि १६ ऑक्टोबर या दोन दिवसांसाठीच आहे.
यावेळचा पाऊस हा मागील अतिवृष्टीप्रमाणे नुकसान करणारा नाही, त्यामुळे घाबरून न जाता शेतकरी आपली कामे करू शकतात, असे तोडकर यांनी हवामान अंदाजामध्ये स्पष्ट केले आहे.