चक्रीवादळ प्रणाली ; राज्यात या तारखेपासून पाऊस वाढनार, तोडकर हवामान अंदाज
Ads
×
कॉल करा
₹ किंमत पहा
खरेदी करा
दिवाळीतील, या पावसाचा प्रभाव केवळ एका किंवा दोन दिवसांसाठी आणि मर्यादित जिल्ह्यांमध्येच असेल. त्यामुळे, या कमी व्याप्तीच्या पावसाच्या भरवशावर पेरणी थांबवणे किंवा इतर शेतीची कामे थांबवणे योग्य नाही. महाराष्ट्रामध्ये २० तारखेपासून हवामान बिघडायला सुरुवात होईल आणि पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
या काळात प्रामुख्याने सोलापूर, कोकण किनारपट्टी आणि सांगलीच्या तुरळक भागांमध्ये पावसाचा अनुभव येईल. मराठवाड्यामध्येही २० तारखेला आभाळात बदल होऊन वारे वाहतील आणि नांदेड पट्ट्यात सरींची सुरुवात होईल…
Ads
×
कॉल करा
₹ किंमत पहा
खरेदी करा
मुख्य रडारवरील जिल्हे आणि व्याप्ती
Ads
×
कॉल करा
₹ किंमत पहा
खरेदी करा
या पावसाच्या रडारवर छत्रपती संभाजीनगर, अहिल्यादेवीनगर (अहमदनगर), बीड (पश्चिम बाजू), जालना, लातूर, परभणी, नांदेड आणि चंद्रपूर हे जिल्हे राहतील. पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, कोल्हापूर, सांगली आणि पुणे परिसरात देखील काही ठिकाणी पाण्याची गरज असलेल्या शेतकऱ्यांना हा पाऊस दिलासा देईल. हा पाऊस सर्वदूर नसून, त्याची व्याप्ती कमी असून, तो विशिष्ट आणि मोजक्या भागांमध्येच अधिक प्रभाव टाकेल. शासकीय हवामान खात्यानुसार, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. तसेच, अमरावती, हिंगोली, नागपूर, वर्धा आणि नाशिकच्या काही तुरळक भागांमध्येही दिलासा मिळू शकतो.
हवामान प्रणाली, पेरणी सल्ला आणि थंडीची चाहूल
ही हवामान प्रणाली बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे निर्माण झाली आहे, ज्याचे परिणाम तेलंगणा, आंध्र प्रदेशमार्गे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रावर होऊ शकतात. पूर्वेकडील वाऱ्यांमुळे छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, सांगली, सोलापूर आणि पुणे या भागात जास्त प्रभाव दिसण्याची शक्यता आहे. अशाप्रकारे वातावरणात प्रत्येक आठवड्याला बदल होत असल्याने, हरभऱ्याची पेरणी किंवा अन्य पेरण्या पूर्णपणे थांबवू नयेत.
ढगाळ वातावरणामुळे थंडीची चाहूल थोडी थांबलेली असली तरी, हे वातावरण निवळताच २२ तारखेपासून थंडीला चांगली सुरुवात होईल. ढगाळ वातावरण कमी असलेल्या भागांमध्ये थंडी जाणवेल, जी उत्तरकडील धुळे, नंदुरबार भागातून लातूर आणि सांगली भागापर्यंत पसरेल…