चक्रीवादळ येनार ; महाराष्ट्रावर काय परिणाम होनार -मच्छींद्र बांगर हवामान अंदाज
Ads
×
कॉल करा
₹ किंमत पहा
खरेदी करा
डॉ. मच्छिंद्र बांगर (हवामान अभ्यासक) यांनी महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीबद्दल एक महत्त्वपूर्ण आणि सविस्तर अंदाज व्यक्त केला आहे. या अंदाजानुसार, नैऋत्य मान्सूनचा परतीचा प्रवास आता मोठ्या प्रमाणात पूर्ण झाला आहे. मान्सून पुढील ४८ तासांत संपूर्ण देशातून निरोप घेईल. १५ ऑक्टोबर ही मान्सूनच्या पूर्ण निरोपाची निर्धारित तारीख असून, त्यानंतर भारतात ईशान्य मान्सूनचे वातावरण सुरू होण्याची शक्यता आहे.
१५ आणि १६ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्राच्या काही भागांत पावसाचा अंदाज आहे. १५ ऑक्टोबरला पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर तसेच रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या काही भागात पावसाचे वातावरण राहील. १६ ऑक्टोबरला सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर आणि बीडच्या भागांमध्ये पाऊस सक्रिय होण्याची शक्यता आहे. मात्र, १७ आणि १८ ऑक्टोबर रोजी राज्यात ढगाळ वातावरण राहण्याची आणि तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे; विशेष असे पावसाळी वातावरण नसेल [ मच्छींद्र बांगर ]
Ads
×
कॉल करा
₹ किंमत पहा
खरेदी करा
ऑक्टोबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात, साधारण २० ते २२ ऑक्टोबरपर्यंत लातूर, धाराशीव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, पुणे, सातारा आणि कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या दक्षिणी पट्ट्यात तुरळक स्वरूपात पाऊस सुरू राहू शकतो अशी माहिती बांगर यांनी दिली.
Ads
×
कॉल करा
₹ किंमत पहा
खरेदी करा
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, यापूर्वी २३ ऑक्टोबरपासून महाराष्ट्रात मुसळधार वादळी पावसाचा जो अंदाज वर्तवला गेला होता, तो आता बदलला आहे आणि मोठे संकट टळले आहे. दिवाळीच्या काळात पाऊस असला तरी, तो प्रभावी किंवा धोकादायक स्वरूपाचा नसेल, त्यामुळे भीतीदायक वातावरण नाही.
चक्रीवादळ तयार होन्याची शक्यता
दरम्यान, बंगालच्या उपसागरामध्ये एक चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता आहे, तर अरबी समुद्रातही एक नवीन सिस्टिम विकसित होईल. ही चक्रीवादळे तीव्र स्वरूपाची असण्याची शक्यता आहे. मात्र, ही वादळे शक्यतो महाराष्ट्राकडे येत नाहीत. ती एकतर दक्षिण भारतातून अरबी समुद्राकडे किंवा उत्तर भारताकडे सरकण्याची शक्यता असते. सध्या तरी महाराष्ट्रावर या वादळांचा फार मोठा परिणाम होण्याची शक्यता नाही आणि २८ ऑक्टोबरपर्यंत राज्यात मोठ्या पावसाचा कोणताही अंदाज नाही अशी माहिती मच्छींद्र बांगर यांनी दिलीय..
तरीही, हवामान सतत बदलत असल्यामुळे दररोजचे हवामान अंदाज बारकाईने पाहणे आवश्यक आहे (मच्छींद्र बांगर,हवामान अभ्यासक)