पंजाब डख हवामान अंदाज ; दिवाळीत पाऊस येनार का ? पहा अंदाज
Ads
×
कॉल करा
₹ किंमत पहा
खरेदी करा
पुढील दोन ते तीन दिवसांत महाराष्ट्रात मोठ्या पावसाची शक्यता नाही. या काळात केवळ पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण भागातच पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी पेरणी सुरू करण्यासाठी किंवा काढणी पूर्ण करण्यासाठी सध्याचा काळ चांगला आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांनी हरभऱ्यासारख्या पिकांची पेरणी करण्यास हरकत नाही, कारण ओलावा कमी झाल्यास दुबार पेरणी करणे कठीण अशी माहिती पंजाब डख यांनी दिली आहे.
दिवाळीमधील पाऊस आणि जिल्हानिहाय अंदाज (ऑक्टोबर २२ ते ३०)
पंजाब डख यांच्या अंदाजानुसार दिवाळीच्या काळात म्हणजेच ऑक्टोबर २२ पासून राज्यात वातावरणात बदल होणार आहे आणि हलका पाऊस होईल. हा पाऊस प्रामुख्याने ऑक्टोबर २५, २६ आणि २७ या दरम्यान अपेक्षित आहे. मात्र, हा पाऊस तुळक स्वरूपाचा असेल, म्हणजेच तो सर्वदूर नसणार आणि कोणत्याही भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार नाही….
Ads
×
कॉल करा
₹ किंमत पहा
खरेदी करा
२२ ऑक्टोबरनंतर पावसाचे वातावरण प्रामुख्याने विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांमध्ये तयार होईल. यात नांदेड, वाशिम, हिंगोली, परभणी, लातूर, बीड आणि धाराशिव या जिल्ह्यांचा समावेश आहे. हा पाऊस काही भागात पडेल तर काही भाग कोरडा राहील. शेतकऱ्यांनी या तुळक पावसाला घाबरण्याचे कारण नाही, पेरणी करायला काही हरकत नाही असे पंजाब डख यांनी सांगितले आहे.
Ads
×
कॉल करा
₹ किंमत पहा
खरेदी करा
चक्रीवादळाची स्थिती आणि थंडीचा अंदाज
सध्या बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात प्रत्येकी एक चक्रीवादळ सक्रिय होण्याची चिन्हे दिसत आहेत. जर ही चक्रीवादळे राज्यात आली, तरच पावसाचे प्रमाण वाढू शकते आणि मोठा पाऊस होऊ शकतो. अन्यथा, सध्याच्या अंदाजानुसार, मोठा पाऊस अपेक्षित नाही. चक्रीवादळांची नेमकी दिशा आणि तीव्रता अजून ठरलेली नाही त्याबद्दल पुन्हा नवीन अंदाज देण्यात येईल (पंजाब डख) राज्यात नोव्हेंबर २ पासून थंडी पडायला सुरुवात होईल.