रब्बी पिकांचे हमीभाव जाहीर, पहा हरबरा, गहू आणि ईतर रब्बी पिकांचे हमीभाव
Ads
×
कॉल करा
₹ किंमत पहा
खरेदी करा
१ ऑक्टोबर २०२५ रोजी केंद्रीय आर्थिक व्यवहार मंत्रिमंडळ समितीची एक महत्त्वाची बैठक पार पडली आणि यामध्ये २०२५-२६ च्या रब्बी हंगामातील सहा प्रमुख पिकांच्या किमान आधारभूत किमती (हमीभाव) जाहीर करण्यात आल्या आहेत.
केंद्र शासनाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला योग्य भाव मिळण्याची अपेक्षा आहे. विशेषतः या घोषणेमध्ये हरभऱ्याच्या हमीभावात प्रति क्विंटल २२५ रुपयांची तर करडईच्या हमीभावात ६०० रुपयांची लक्षणीय वाढ करण्यात आली आहे.
Ads
×
कॉल करा
₹ किंमत पहा
खरेदी करा
या घोषणेनुसार, रब्बी हंगामातील सहा पिकांसाठी प्रति क्विंटल जाहीर झालेले नवे हमीभाव आणि वाढ खालीलप्रमाणे आहे.
Ads
×
कॉल करा
₹ किंमत पहा
खरेदी करा
हरभरा (Chana): ५,८७५ रुपये प्रति क्विंटल (मागील वर्षापेक्षा २२५ रुपयांची वाढ)
गहू (Wheat): २,५८५ रुपये प्रति क्विंटल (मागील वर्षापेक्षा १६० रुपयांची वाढ)
मसूर (Lentil): ७,००० रुपये प्रति क्विंटल (मागील वर्षापेक्षा ३०० रुपयांची वाढ)
मोहरी (Mustard): ६,२०० रुपये प्रति क्विंटल (मागील वर्षापेक्षा २५० रुपयांची वाढ)
करडई (Safflower): ६,५४० रुपये प्रति क्विंटल (मागील वर्षापेक्षा ६०० रुपयांची वाढ)
बार्ली (Barley): २,१५० रुपये प्रति क्विंटल
हे हमीभाव निश्चित करताना मानवी श्रम, बी-बियाणे, खत, कीटकनाशके, सिंचन शुल्क, डिझेल-विजेचा खर्च, जमिनीचे भाडे तसेच शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या श्रमाचे मूल्य अशा अनेक खर्चाचा विचार केला जातो.
तरीसुद्धा, सध्या जाहीर झालेली वाढ (जी बहुतेक पिकांसाठी १०० ते २०० रुपयांच्या दरम्यान आहे) ही वाढत्या खर्चाच्या तुलनेत अपुरी असल्याचे मत शेतकऱ्यांचे आहे. त्यामुळे, शेतकऱ्यांच्या माध्यमातून या हमीभावामध्ये अजून मोठ्या प्रमाणात वाढ करण्याची मागणी केली जात आहे.