रब्बी हंगाम हेक्टरी 10000 अनुदान, असे मिळनार अनुदान..हे काम करा…
Ads
×
कॉल करा
₹ किंमत पहा
खरेदी करा
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीच्या (NDRF) निकषांनुसार प्रति हेक्टरी ₹८,५००/- (तीन हेक्टरच्या मर्यादेत) मदत जाहीर करन्यात आली आहे. रब्बी हंगामासाठी बी-बियाणे आणि खते खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ₹१०,०००/- चे निविष्ट अनुदान (Input Grant) देण्याचीही घोषणा करण्यात आली आहे. या दोन्ही मदतीपैकी, ₹१०,०००/- च्या अनुदानाची प्रक्रिया तात्काळ सुरू करण्यात आली आहे…
शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या ₹१०,०००/- च्या अनुदानाचे वितरण थेट लाभ हस्तांतरण (DBT) पद्धतीने केले जात आहे. ज्या शेतकऱ्यांचे फार्मर आयडी (Farmer ID) तयार झाले आहेत आणि त्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेले आहे, अशा शेतकऱ्यांची माहिती गोळा करून ही रक्कम त्यांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया कृषी विभागाने सुरू केली आहे.
Ads
×
कॉल करा
₹ किंमत पहा
खरेदी करा
यासाठी, शेतकऱ्यांनी कोणताही ऑनलाइन अर्ज करण्याची गरज नाही. गावपातळीवरील कृषी सहाय्यक किंवा सहाय्यक कृषी अधिकारी यांच्या माध्यमातून बाधित शेतकऱ्यांची यादी तयार केली जात आहे.
Ads
×
कॉल करा
₹ किंमत पहा
खरेदी करा
शेतकऱ्यांनी लवकरात लवकर त्यांच्या गावचे कृषी अधिकारी किंवा कृषी मित्र यांच्याशी संपर्क साधून आपली कागदपत्रे जमा करणे आवश्यक आहे. अनुदान जमा होण्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांमध्ये प्रामुख्याने आधार कार्ड (आधार संलग्न बँक खाते), फार्मर आयडी (Farmer ID) आणि बँक पासबुक यांचा समावेश आहे. ही कागदपत्रे वेळेत जमा केल्यास, डीबीटीद्वारे (DBT) ₹१०,०००/- चे अनुदान थेट त्यांच्या आधार-संलग्न बँक खात्यात जमा केले जाईल.
NDRF निकषांनुसार मिळणारे ₹८,५००/- चे अनुदान मदत व पुनर्वसन विभागाकडून निधी उपलब्ध झाल्यावर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाईल, सध्या शेतकऱ्यांनी ₹१०,०००/- चे अनुदान मिळवण्यासाठी तातडीने कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा आणि आपली कागदपत्रे जमा करावी…