लाडकीचा आँक्टोंबरचा हप्ता दिवाळीला मिळनार का ? पुढील हप्ता कधी ?
Ads
×
कॉल करा
₹ किंमत पहा
खरेदी करा
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आँक्टोंबरचा १६ वा हप्ता दिवाळीपूर्वी मिळणार का? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सोळाव्या हप्त्याबद्दल, म्हणजेच ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याबद्दल अनेक महिला लाभार्थींमध्ये उत्सुकता आहे. हा हप्ता दिवाळी सणाच्या आधी पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा होईल का, असा महत्त्वाचा प्रश्न महिला विचारत आहेत.याबाबत सविस्तर माहिती आपण पाहुया…
या योजनेअंतर्गत मिळणारी आर्थिक मदत महिलांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत असल्याने, दिवाळीपूर्वी हा हप्ता मिळाल्यास त्यांना मोठा दिलासा मिळू शकतो…
Ads
×
कॉल करा
₹ किंमत पहा
खरेदी करा
या योजनेचा हप्ता वितरित करण्यासाठी राज्य सरकारला सर्वप्रथम निधी मंजूर करणे आवश्यक असते. निधी मंजूर झाल्यानंतर, किती रक्कम देण्यात आली आहे आणि पात्र लाभार्थ्यांची संख्या किती आहे, याबद्दल माहिती देणारा एक शासन निर्णय (GR) सरकारकडून काढला जातो. सध्याच्या माहितीनुसार, राज्य सरकारने ऑक्टोबर महिन्याचा हप्ता किंवा दिवाळीपूर्वी हप्ता जमा करण्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती किंवा शासन निर्णय अद्याप निर्गमित केलेला नाही…
Ads
×
कॉल करा
₹ किंमत पहा
खरेदी करा
सप्टेंबर महिन्याचा हप्ता मागील आठवड्यात पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये झाला आहे. ऑक्टोबर महिन्याचा हप्ता वेळेत जमा करायचा असेल, तर राज्य सरकारला येत्या एक ते दोन दिवसांत निधी मंजूर करणे आवश्यक आहे. निधी मंजूर झाल्यानंतरही, तो हप्ता प्रत्यक्ष बँक खात्यात जमा होण्यासाठी दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे, दिवाळीपर्यंत हा सोळावा हप्ता बँक खात्यात जमा होण्याची शक्यता कमी आहे .कारण आजून निधी मंजूर झालेला नाही.
सध्याची परिस्थिती पाहता, ऑक्टोबर महिन्याचा हा सोळावा हप्ता नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये वितरित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिवाळीला हा हप्ता मिळन्याची शक्यता नसल्यात जमा झाले.