सरकारचं दिवाळीत ₹२१०० खास गिफ्ट, कुणाला होणार फायदा? किटमधील २५ वस्तूंची यादी
राज्यात यावर्षी अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. सप्टेंबर महिन्यात अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. धाराशिव, सोलापूर, बीड, अहिल्यानगर या ठिकाणी पावसाने अगदी झोडपून काढले होता.लाखो नागरिकांचे नुकसान झाले आहे. पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी घुसले आहेत. अक्षरश: अनेकांचे संसार वाहून गेले आहेत.
पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात
सोलापूर जिल्ह्यात पावसामुळे हाहाकार माजला होता. १०८ गावांमध्ये पाणी शिरले होते. नदीकाठच्या जवळपास ११ हजार ८०५ घरांमध्ये पाणी घुसले होते. त्यामुळे त्यांच्या घरातील अनेक वस्तू वाहून गेल्या. अन्नधान्यांचे नुकसान झाले. या नागरिकांची दिवाळी आनंदात जावी, यासाठी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता या नागरिकांना शासनाकडून जीवनावश्यक वस्तूंचे किट मिळणार आहे. यामध्ये २५ वस्तू असणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने शासनाला पाठवला आहे.
















