Pm kisan 21 installment ; 31 लाख शेतकऱ्यांना यादीतून वगळण्यात येनार… हि आहेत कारणं
Ads
×
कॉल करा
₹ किंमत पहा
खरेदी करा
PM Kisan 21st Installment : जर तुम्ही प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. सरकारने २१ वा हप्ता जारी करण्यापूर्वी देशभरातील संशयित शेतकऱ्यांच्या यादीची तपासणी सुरू केली आहे.यात विशेषतः अशा लोकांची नावे आहेत, जे दुहेरी लाभ घेत आहेत. म्हणजेच पती-पत्नी दोघेही एकाच वेळी योजनेचा फायदा घेत आहेत…
तर मग आता प्रश्न असा आहे की, तुमचं नावही या यादीतून काढलं गेलं आहे का ? काळजी करू नका, खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही फक्त १ मिनिटात तुमचं स्टेटस तपासू शकता…
Ads
×
कॉल करा
₹ किंमत पहा
खरेदी करा
PM किसानचं स्टेटस कसं तपासायचं?
सर्वात आधी https://pmkisan.gov.in/ वर जा.
होमपेजवर ‘Know Your Status’ किंवा ‘Beneficiary Status’ वर क्लिक करा.
आता तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर किंवा आधार नंबर टाका.
कॅप्चा कोड भरा आणि ‘Get Data’ वर क्लिक करा.
आता तुमच्यासमोर संपूर्ण तपशील उघडेल.
या तपशिलांमध्ये तुमचं नाव यादीत आहे की नाही, मागील हप्ता कधी आला, पुढील हप्त्याची स्थिती काय आहे, हे सर्व कळेल.
जर साइटवर ‘No Record Found’ दिसलं, तर समजा की तुमचं नाव सध्या यादीतून वगळण्यात आलं आहे किंवा पडताळणी प्रक्रियेत आहे.
Ads
×
कॉल करा
₹ किंमत पहा
खरेदी करा
पीएम किसान योजनेतून हे शेतकरी बाहेर होनार
कृषी मंत्रालयाच्या तपासात असं समोर आलं आहे की, सुमारे ३१ लाख शेतकरी असे आहेत ज्यांची नावे संशयास्पद आढळली आहेत. यामध्ये पती-पत्नी दोघेही योजनेचा लाभ घेत होते.1.76 लाख अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे.. सरकारने सर्व राज्यांना १५ ऑक्टोबर २०२५ पर्यंत तपासणी पूर्ण करून चुकीच्या लाभार्थ्यांना काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत.
या यादीतील प्रमुख अनियमितता
पती-पत्नी दोघेही लाभार्थी: 17.87 लाख लाभार्थी असे आहेत, ज्यांच्या कुटुंबात पती आणि पत्नी दोघेही या योजनेचा लाभ घेत आहेत. नियमानुसार, एका कुटुंबात फक्त एकाच व्यक्तीला लाभ मिळू शकतो.
अल्पवयीन मुले घेतात लाभ: पडताळणीमध्ये आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. सुमारे 1.76 लाख अल्पवयीन मुले देखील या योजनेचा लाभ घेत आहेत.
जमिनीची चुकीची माहिती: 33.34 लाख लाभार्थ्यांनी त्यांच्या जमिनीच्या नोंदींबद्दल (Land Records) चुकीची माहिती दिली आहे.
योजनेची पडताळणी अजूनही सुरू असून, यातून आणखी अपात्र नावे समोर येण्याची शक्यता आहे. वरील सर्व अनियमिततांमुळे या लाभार्थ्यांना आता योजनेतून वगळण्यात येईल.