आज, १८ ऑक्टोबर रोजी, कृषी उत्पन्न बाजार समिती (APMC), अकोट (जिल्हा अकोला) येथे या वर्षातील कापूस लिलावाला (Cotton Auction) मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे.
शेतकरी बांधवांसाठी ही एक महत्त्वाची बातमी आहे, कारण लिलावाच्या पहिल्याच दिवशी कापसाला चांगला दर मिळाला आहे. यावर्षीच्या कापसाचे दर काय राहतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले असताना, मुहूर्ताच्या पहिल्याच दिवशी मिळालेल्या दराने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे….
Ads
×
कॉल करा
₹ किंमत पहा
खरेदी करा
आजच्या कापूस लिलावातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवसाचा सर्वोच्च भाव. मुहूर्त असल्याने कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट येथे कापसाला ९,३११ रुपये प्रति क्विंटल इतका विक्रमी दर मिळाला आहे. हा या दिवसाचा सर्वोच्च भाव ठरला आहे.
Ads
×
कॉल करा
₹ किंमत पहा
खरेदी करा
आकोट येथील आजच्या आनखी दोन कापूस भावाच्या पावत्या उपलब्ध आहे त्यामध्ये 8751 आणि 7500 रूपयांचा भाव मिळाला आहे.. तीनही पावत्या पहा👇
आगामी दिवसांमध्ये कापूस बाजारभावात काय चढ-उतार होतात, याकडे आता सर्व शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे लक्ष लागलेले आहे.